जागतिक महिला दिनानिमित्त विशेष कार्यक्रम
रविवार, दिनांक 7 मार्च 2021 रोजी सायंकाळी ठीक सात वाजता या लिंक वर कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण होईल
विषय - विज्ञान तंत्रज्ञान आणि महिला उद्योग
वक्ता- अथर्व डोके
१९१० साली कोपनहेगन येथे भरलेल्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषदेत, ८ मार्च रोजी अमेरिकेतील स्त्री-कामगारांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ, ८ मार्च हा `जागतिक महिला-दिन’ म्हणून स्वीकारावा असा ठराव पास झाला. यानंतर युरोप, अमेरिका वगैरे देशात सार्वत्रिक मतदानाच्या हक्कासाठी मोहिमा उघडल्या गेल्या. त्यांचा परिणाम म्हणून १९१८ साली इंग्लंडमध्ये व १९१९ साली अमेरिकेत महिलांना मदतानाचा हक्क मिळाला.
पुढे १९७५ हे वर्ष युनोने `जागतिक महिला वर्ष’ म्हणून जाहीर केले. त्यानंतर स्त्रियांच्या समस्या ठळकपणे समाजासमोर येत गेल्या. महिलांच्या संघटनांना बळकटी आली. बदलत्या सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक परिस्थितीनुसार काही प्रश्नांचे स्वरूप बदलत गेले, तशा महिला संघटनांच्या मागण्याही बदलत गेल्या. आता जगभर सर्वत्र ८ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा होत आहे. या वर्षीची जागतिक महिला दिनाची ‘महिला नेतृत्व – कोविड १९ जगतात भविष्यातील समान संधी’. (“Women in leadership: Achieving an equal future in a COVID-19 world”) ही मध्यवर्ती संकल्पना आहे.
रविवार, दि. ७ मार्च २०२१ रोजी सायन काय सायंकाळी 7 : 20 ते 7: 50या वेळेत ऑनलाईन कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. हा कार्यक्रम विनामूल्य आणि सर्वांसाठी खुला आहे. आपणा सर्वांना विनंती आहे की या ऑनलाईन कार्यक्रमाचा लाभ जरूर घ्यावा.